www.24taas.comझी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीवाल्यांचा दिल जिंकल्यानंतर `आप`ने आता लोकसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जास्तच जास्त राज्यांमधून मोठ्या संख्येने उमेदवार कसे निवडणून आणता येतील, यावर `आप`ने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे.
दिल्लीत शनिवारी `आप`च्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक पार पडली, यात `आप`च्या बहुतेक नेत्यांचा सूर हाच होता. हरियाणा सारख्या लहान राज्यातही काही ठिकाणी `आप` लोकसभेच्या जागांसाठी विजयाच्या जवळ असल्याची चर्चा आहे. दिल्लीत आपने काँग्रेसला तीननंबरवर ठेवलंय, तर दिल्लीप्रमाणे आता लोकसभा निवडणुकीतही आप देशभरात भाजपची डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
या देशात राहुल गांधी विरूद्ध नरेंद्र मोदी असा सामना होणे, हे दुर्देवी आहे. हे थांबवण्यासाठी तसेच जनतेला आम्ही एक नवा पर्याय देऊ शकतो का?, यावर आपमध्ये च्रर्चा सुरू असल्याचं पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.
देशातील राजकारणात नरेंद्र मोदी यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचं नाव सतत चर्चेत राहत असल्याने, नरेंद्र मोदींच्या पाठिराख्यांची मात्र चिंता वाढली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी यांचा प्रभाव लोकसभा निवडणुकीवर निश्चितच मोठ्या प्रमाणावर असेल, असं राजकीय जाणकारांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.