नवी दिल्ली : केंद्रातील भाजप सरकारच्या वादग्रस्त भूमी अधिग्रहन विधेयकाविरोधात आम आदमी पक्षाने (आप) आज काढलेल्या मोर्चा दरम्यान एक शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला. त्याचे रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
एका शेतकऱ्यांने झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी राम मनोहर लाल लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर होती. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ती व्यक्ती राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यातद येत आहे.
दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी या पिडीत शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात गेले होते. ‘मित्रांनो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी मला घराबाहेर काढले आहे. माझे नाव गजेंद्र असून, मला तीन मुले आहेत. मला कोणतेही काम नाही. जय जवान, जय किसान, जय राजस्थान,‘ असे या व्यक्तीने चिठ्ठीत लिहिलेले आढळून आले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.