दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात सात जणांचा मृत्यू

शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या होंडा सीएल कंपनीजवळ वेगात येणाऱ्या गाडीला झालेल्या विचित्र अपघातात सात जण ठार झालेत.

Updated: Aug 30, 2014, 07:23 PM IST
दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात सात जणांचा मृत्यू  title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ग्रेटर नोएडाच्या होंडा सीएल कंपनीजवळ वेगात येणाऱ्या गाडीला झालेल्या विचित्र अपघातात सात जण ठार झालेत.

कासनाकडून परि चौकाकडे जाणाऱ्या ‘वॅगन आर’ गाडीसमोर अचानक आलेल्या दोन जणांना वाचवण्याच्या प्रयत्नात ड्रायव्हरनं गाडी दुसऱ्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न केला... पण, गाडी वेगात असल्यामुळे गाडीचं नियंत्रण सुटलं आणि गाडीनं बाजुच्या डिव्हायडरला धडक दिली.

धक्कादायक म्हणजे, यामुळे गाडीत बसलेल्या पाच जणांनी या अपघातात आपला जीव गमावलाच पण, सोबतच रस्ता क्रॉस करणाऱ्या दोन व्यक्तींनाही गाडीची धडक बसली... आणि तेही या अपघातात ठार झाले. त्यामुळे, या अपघातात तब्बल सात जणांना आपले प्राण गमावावे लागले.

घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर त्यांनी या सातही जणांना जवळच्याच कैलास हॉस्पीटलमध्ये हलवलं.
गाडीतून प्रवास करणारे पाचही जण नोएडाच्या सेक्टर 12 मध्ये राहणारे आहेत. तर, रस्ता क्रॉस करणाऱ्यांपैकी एकाचं नाव राहुल असल्याचं समजतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x