जेवण बनवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अॅसिडनं जाळलं

जिल्ह्याच्या गोहपारू पोलीस स्टेशनमध्ये खन्नोधी गावातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका व्यक्तीनं पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्यानं चिडून अॅसिड टाकून जाळलं. 

PTI | Updated: Sep 16, 2014, 05:10 PM IST
जेवण बनवायला नकार दिल्यानं पतीनं पत्नीला अॅसिडनं जाळलं title=

शहडोल: जिल्ह्याच्या गोहपारू पोलीस स्टेशनमध्ये खन्नोधी गावातील एक धक्कादायक घटना पुढे आलीय. एका व्यक्तीनं पत्नीनं जेवण बनवण्यास नकार दिल्यानं चिडून अॅसिड टाकून जाळलं. 

गोहपारू एसएचओ गुलाब सिंहनं सांगितलं की, खन्नोधी गावातील रहिवासी असलेल्या रामजी सोनीनं काल आपल्या घरी पोहोचून पत्नीला जेवण तयार करायला सांगितलं. मात्र जेव्हा पत्नीनं जेवण बनवायला नकार दिला तेव्हा पहिले त्यानं पहिले बायकोला मारलं नंतर तिच्यावर अॅसिड टाकून जाळलं.  

घटनेनंतर रामजी फरार आहे. एसएचओनं सांगितलं की, रामजी अॅसिडचा वापर घरी सोन्याचे दागिने स्वच्छ करण्यासाठी करायचा. पत्नीच्या रिपोर्टनुसार आता पोलीस तपास करत आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.