'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा!

अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय. 

Updated: Jan 14, 2016, 12:20 PM IST
'लक्ष्मी' बनली फॅशन ब्रॅन्डचा नवा चेहरा! title=

<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/uJucK5qmV-w" frameborder="0" allowfullscreen></iframe>

नवी दिल्ली : अॅसिड हल्ल्याच्या खुणा चेहऱ्यावर कायम असल्या तरी आत्मविश्वासाच्या जोरावर आज लक्ष्मी अग्रवाल आज एका फॅशन ब्रॅन्डचा चेहरा बनलीय. 

लग्नाचा प्रस्ताव फेटाळला म्हणून, १५ वर्षांची असताना एका ३२ वर्षीय इसमानं भर रस्त्यावर लक्ष्मीच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकलं होतं. त्याच्या खुणा आजही लक्ष्मीच्या चेहऱ्यावर आणि काळजावर कोरल्या गेल्यात.

पण, अनेकांसाठी प्रेरणा ठरलेली लक्ष्मी आता एका नव्या जाहिरातीत दिसतेय. 'आपण जे पाहतो तेच केवळ आपलं आयुष्य नसतं... कारण डोळ्यांना जे दिसतं त्याहून आणखी गोष्टी अस्तित्वात असतात. कारण, खरी सुंदरता ही डोळ्यांत असते' असं ती या जाहिरातीत म्हणताना दिसतेय. 

फॅशन ब्रँड 'व्हिवा एन दिवा'नं लक्ष्मीसोबत 'फेस ऑफ करेज' (धैर्याचा चेहरा) कॅम्पेन सुरू केलंय.