पिनाका एमके-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पिनाका एमके-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. जैसलमेर जिल्ह्यातील चांधण फिल्ड फायरिंग रेंजमध्ये लष्कर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली. क्षेपणास्त्राने ६० किमीवर असलेल्या लक्षाला अचूक साधलं. 

Updated: May 30, 2015, 07:52 PM IST
पिनाका एमके-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी title=

जैसलमेर: राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पिनाका एमके-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. जैसलमेर जिल्ह्यातील चांधण फिल्ड फायरिंग रेंजमध्ये लष्कर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चाचणी करण्यात आली. क्षेपणास्त्राने ६० किमीवर असलेल्या लक्षाला अचूक साधलं. 

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे मल्टी बॅरल क्षेपणास्त्र आहे. जे ४४ सेकंदात एकाचवेळी १२ रॉकेट लॉन्च करू शकतं. कारगिल युद्धादरम्यान या क्षेपणास्त्राचा वापर करण्यात आला होता. डीआरडीओने यात आवश्यक ते बदल करुन याची चाचणी करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं क्षेपणास्त्र आहे. 

याआधी पिनाका एमके-१ ची मारक क्षमता ४० किमी होती. नवीन सुधारीत एमके-२ची मारक क्षमता वाढून ६० झाली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.