लाजपतनगर : दिल्लीच्या लाजपतनगर भागात रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट करण्यात आले. त्यावेळी स्कॅनिंगनंतर लक्षात आले की त्याच्या पोटात कॅप्सुलचे पॅकेट आहेत. विशेष म्हणजे या पॅकेटमध्ये ९५ कॅप्सुल हेरॉइनच्या आहे. खुल्या बाजारात याची किंमत तीन कोटी रुपये आहे.
लाजपतनगरच्या कस्तुरबा निकेतनजवळ रस्त्यावर अफगाणिस्तानी नागरिक नूर आमिर हा बेशुद्ध पडला होता. लोकांनी सूचना दिल्यावर पोलिसांनी त्याला एम्स रुग्णालयात दाखल केले. त्यात त्याचे सीटी स्कॅन करण्यात आले. त्यावेळी त्याच्या पोटात पॅकेट पडल्याचे लक्षात आले. त्याला ऐनिमा देण्यात आला. नूरच्या पोटात असलेल्या पॅकेटमधून आतापर्यंत ४८ कॅप्सुल काढण्यात आल्या आहेत. नार्कोटिक्स डिपार्मेंटच्या एक्सपर्टला बोलविल्यानंतर चाचणी करण्यात आली त्यावेळी या हेरॉइन असल्याचे स्पष्ट झाले. अफगाणी नागरिकांवर एनडीपीएस कायद्यातंर्गत केस दाखल करण्यात आली आहे.
नूर आमिर याच्या पोटात आणखी ४७ कॅप्सुल अजून आहे. डॉक्टर तेही कॅप्सुल काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. नूर आमिर हा अफगाणिस्तानच्या जलालाबाद येथील राहणारा असून तो ८ मे रोजी केएएम एअरवेजच्या माध्यमातून दिल्ली एअरपोर्टला आला होता. तो महिपालपूर येथे थांबला होता. ९ तारखेला ग्राहकांच्या शोधात लाजपतनगर येथे आला होता. त्या ठिकाणी त्याने काही अफगाणी नागरिकांशी भेट घेतली.
पोट फुटण्याच्या भीतीने त्याने दिल्ली आल्यावर जेवण घेतले नव्हते ना पाणी प्यायला नव्हता. उष्णतेत उपाशी राहिल्याने तो बेशुद्ध झाला. पोलिसांना अजून नूर आमिरचा पासपोर्ट आणि व्हिजा मिळाला नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.