कर्नाड यांच्यानंतर भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी

गिरीश कर्नांड यांच्यानंतर आता भाजप खासदारानंही आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केलाय.

Updated: Nov 12, 2015, 06:43 PM IST
कर्नाड यांच्यानंतर भाजप खासदाराला जीवे मारण्याची धमकी  title=

बंगळुरू : गिरीश कर्नांड यांच्यानंतर आता भाजप खासदारानंही आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केलाय.

म्हैसूरच्या कोडागू इथले खासदार प्रताप सिन्हा यांनी हा दावा केलाय. कर्नाटक सरकारद्वारे आयोजित टीपू सुल्तान जयंती सोहळ्याला विरोध केल्यानं फेसबुकवर ही धमकी आल्याचं प्रताप सिन्हा यांनी म्हटलंय.

अधिक वाचा - अभिनेते गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी

दरम्यान,  ज्ञानपीठ पुरस्कार विजेते नाटककार आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांना ठार मारण्याची धमकी मिळालीय. कुलबर्गीप्रमाणेच तुमचे हाल होतील, असं त्यांना धमकवण्यात आलंय. चंद्रा नावाच्या एका अज्ञाताने ट्विटरवर ही धमकी दिलीय. दरम्यान, ट्विटरवर धमकी दिल्यानंतर हे ट्विट काढून टाकण्यात आले आहे. बुधवारी कर्नाड यांनी बंगळुरु येथे 'टिपू सुल्तान हे हिंदू असते तर छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे त्यांना दर्जा मिळाला असता' असं वक्तव्य केलं होतं.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.