दोन पत्नींचा पती प्रेयसीसोबत पळाला!

दोन-दोन पत्नींचा पती असून सुद्धा आपल्या पत्नीपेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणीसोबत पळून जाणाऱ्या व्यक्तीला गुजरात पोलिसांनी अटक केलीय. आरोपी रालू महिदा 42 वर्षीय असून त्याच्यावर दारूच्या तस्करीचे अनेक आरोप आहेत.

Updated: Jul 8, 2015, 04:32 PM IST
दोन पत्नींचा पती प्रेयसीसोबत पळाला! title=

अहमदाबाद: दोन-दोन पत्नींचा पती असून सुद्धा आपल्या पत्नीपेक्षा अर्ध्या वयाच्या तरुणीसोबत पळून जाणाऱ्या व्यक्तीला गुजरात पोलिसांनी अटक केलीय. आरोपी रालू महिदा 42 वर्षीय असून त्याच्यावर दारूच्या तस्करीचे अनेक आरोप आहेत.

एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार महिदा आधीपासूनच दोन पत्नींचा नवरा आहे. संपूर्ण नाडियाद शहरानं या लव्ह जिहादच्या विरोधात दोन दिवस बंद पाळला. नंतर महिदानं व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. ज्यात पटेल कुटुंबातील एक तरुणी म्हणतेय की, ती कोणत्याही दबावानं नाही तर आपल्या मर्जीनुसार महिदासोबत घरातून पळून गेलीय. 

मुलीच्या कुटुंबियांनी दारू तस्करी करणाऱ्या महिदा विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. कुटुंबियांच्या मते आरोपीनं तरूणीला फसवून पळवून नेलंय. पोलीस सध्या मुलीचा शोध घेत आहेत. 

महिदाच्या भविष्याचा निर्णय आता तरुणीच्या जबाबावर अवलंबून आहे. पोलिसांच्या मते जरी या प्रकरणात महिला सुटला तरी दारू तस्करीच्या प्रकरणात त्याला अटक केली जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.