ISIच्या संपर्कात वायुसेनेचा जवान, ब्रिटनच्या दामिनीने फसविले

पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला माहिती देणारा भारतीय वायुसेनेचा जवान रंजीत यांने मोठा खुलासा केलाय. 

PTI | Updated: Dec 30, 2015, 04:46 PM IST
ISIच्या संपर्कात वायुसेनेचा जवान, ब्रिटनच्या दामिनीने फसविले title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेला माहिती देणारा भारतीय वायुसेनेचा जवान रंजीत यांने मोठा खुलासा केलाय. रणजितने सांगितले, दामिनीला गुप्त माहिती देण्यासाठी ३० हजार रुपये मला मिळाले होते. याबदल्यात रणजितने काही महत्वाची गुप्त माहिती दिली. याप्रकरणी या जवानाला बडतर्फ करण्यात आलेय.

या प्रकरणात रणजित याला दामिनी मॅकनॉट या ब्रिटनमधील माध्यम अधिकारी असलेल्या महिलेच्या बनावट नावाने काम करणाऱ्यांने फसवले, हवाई दलाची माहिती आमच्या नियतकालिकाला हवी आहे असे सांगून त्याच्याकडे माहिती मागण्यात आली. तसेच या बदल्यात रणजितला ३० हजार रुपये दिल्याचे पुढे आलेय.  

या जवानाने पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केली असून त्याला पंजाबमधील भटिंडा येथे दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हेरगिरी टोळीने त्याला महिलांच्या मदतीने आकर्षित करून जाळ्यात ओढले होते. 

रणजित के. के. असे त्याचे नाव असून तो भारतीय हवाई दलात भटिंडा येथे काम करीत होता व अलिकडेच त्याला बडतर्फ करण्यात आले होते. नंतर त्याला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने लष्करी गुप्तचरांच्या मदतीने अटक केली. तो मूळ केरळातील मल्लापुरमचा असून भारतीय हवाई दलात २०१० मध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर कार्यालयीन गोपनीयता कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

या जवानाच्या अटकेमुळे सीमेवरील एक हेरगिरी जाळे उघड झाले आहे. या प्रकरणात रणजित याला दामिनी मॅकनॉट या ब्रिटनमधील माध्यम अधिकारी असलेल्या महिलेच्या बनावट नावाने काम करणाऱ्या एकाने फसवले. त्यानेही हवाई दलातील ताज्या घडामोडींची माहिती दिली व त्याच्या खात्यात पैसे जमा झाले असे अतिरिक्त पोलीस आयुक्त आलोक कुमार यांनी सांगितले.

असा कट झाला उघड
रणजित याला ब्रिटिश उच्चार असलेल्या आवाजात महिलेचे फोन व्हीओआयपीवर येत होते. ती दामिनी मॅकनॉट असे नाव सांगत असे. तिने त्याची मुलाखतही घेतली आणि आणखी माहिती देण्यास सांगितले. त्याने ईमेल माध्यमातूनही गोपनीय माहिती दिली आहे. 

रणजित आणि कफैतउल्ला खान यांच्या टोळीत काही संबंध असल्याचे पुरावे नाहीत. कैफतउल्ला खान हा पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला माहिती देत होता. तो जम्मूहून भोपाळला जात असताना त्याला पकडले होते. त्यानंतर याच टोळीतील तीन जणांना काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात अटक करण्यात आली होती.