सैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!

सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 9, 2014, 04:07 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सैफई
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
गरीबांना मदत करण्यासाठी आखडता हात घेणाऱ्या यूपी सरकारनं या महोत्सवात सहभागी होणाऱ्या बॉलिवूड स्टारकास्टवर मुक्त हस्तानं कोट्यवधींची उधळण केलीये. सपा नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी यावेळी दबंग स्टार सलमान खान, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, रणवीर सिंह, मल्लिका शेरावत यांसोबत संगीतकार साजिद-वाजिद आणि कोरिओग्राफर रेमो डिसूजा यांना निमंत्रीत करण्यात आलं.
यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र थंडीत बळी पडणाऱ्या गरीब जनतेच्या मदतीसाठी याच सरकारकडे पैसै नाहीत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.