अखिलेश सरकारचा 'सैफई महोत्सवा'त ३०० कोटींचा चुराडा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपला आजचा कार्यक्रम अचानक बदलून देढ इश्किया या आज प्रदर्शीत होणा-या हिंदी चित्रपटाच्या प्रीमियर शोला दांडी मारली. मुजफ्फरनगर आणि शामली येथील छावणीतील दंगलग्रस्तांच्या मूलभूत गरजाही मदतकार्यातून भगवल्या जात नाहीत तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारनं सैफई महोत्सवात तब्बल ३०० कोटींचा चुराडा केल्यानं अखीलेश यादव सरकार वादाच्या भोव-यात सापडलंय.
Jan 10, 2014, 09:36 PM ISTमुख्यमंत्री अखिलेश यादव मीडियावर घरसले
एकीकडे भाकरीच्या एका तुकड्यासाठी तडफडणारे. थंडीत कुडकुडत जीव सोडणारे दंगलग्रस्त तर दुसरीकडे सैफईत झालेला नेते मंडळींचा फिल्मी मसाला. असं काहीसं चित्र काल उत्तरप्रदेशात पाहायला मिळालं. दरम्यान, टीकेची झोड उठली असताना माफी मागायचं सोडून मुख्यमंत्री अखिलेश यादव महोदय मीडियावरच घसरले.
Jan 10, 2014, 05:10 PM ISTअहो आश्चर्यम... सलमान खानला शाहरुखचा पाठिंबा
सैफई महोत्सवातील परफॉरमन्सवरून वादाच्या भोवऱ्या अडकलेला सलमान खान याने आपल्या फेसबुक पेजवरून खुलासा केल्यानंतर सलमानला चक्क अभिनेता शाहरुख खानने पाठिंबा दिला आहे.
Jan 10, 2014, 12:17 PM ISTसैफई महोत्सवात अवतरलं बॉलिवूड!
सैफई महोत्सवावरून उत्तर प्रदेश सरकार चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता आहे.. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये गरीब मजूर कडाक्याच्या थंडीचे बळी जात असताना सैफईमधे उत्तर प्रदेश सरकारनं समाजवादी पार्टीच्या नेतेमंडळींच्या मनोरंजनासाठी आलिशान महोत्सवाचं आयोजन केलंय.
Jan 9, 2014, 02:51 PM IST