मुंबई : भाजप नेते अमित शहा यांनी काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांची भेट टाळलीय आणि ते दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे, दर्डा यांचा चांगलाच हिरमूस झालेला दिसतोय.
काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा आज भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतील अशी शक्यता होती. दर्डांच्या वृत्तपत्राने शहांना आज चहापानासाठी आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर, थोड्याच वेळात अनेक तर्क-वितर्कांना सुरवात झाली होती... राजेंद्र दर्डा भाजपच्या मार्गावर असल्याचंही बोललं जात होतं.
मात्र, शहा यांनी ही भेटच टाळलीय. त्यामुळे, या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. राजेंद्र दर्डांची भेट न घेता अमित शाह दिल्लीकडे रवाना झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.