नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये भाजपने मिळवलेल्या यशाबाबत भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेऊन आनंद व्यक्त केला. आम्ही पुन्हा एकदा काँग्रेसला पराभूत केलं आहे. आमची वाटचाल काँग्रस मुक्त सुरुच राहिली आहे, असा टोला शाह यांनी निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसला लगावला.
जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबत भाजपचे सर्व पर्याय खुले आहेत. कोणाचं समर्थन घेऊही शकतो असं अमित शाह म्हणाले. तसंच काँग्रेसमुक्त भारत अभिय़ान यशस्वी होत असल्याचंही ते म्हणाले.
काश्मिरच्या सीमा भागात मोदी लाटेचा इम्पॅक्ट दिसून आलाय. ११ पैकी १० जागा भाजपकडे आल्यात. तर एक जागा नॅशनल कॉन्फरन्सला मिळाली आहे. सिमाभागात गोळीबार झालेल्या भागात मोदींचा करीश्मा दिसून आलाय.
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फेकला गेला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपच्या जागांमध्ये आणि मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे स्पष्ट अमित शाह यांनी केले.
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही राज्यातील मतदारांचे आभार मानले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही यश मिळवले आहे. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला. हरियाणामध्ये आमच्या जागा चार वरून ५० पर्यंत जाऊन पोहोचल्या. झारखंड राज्याची निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच स्वबळावर भाजप तिथे सरकार स्थापन करणार आहे.
काश्मीरमध्येही गेल्यावेळच्या निवडणुकीच्या तुलनेत आमच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, या चारही राज्यांमध्ये कॉंग्रेस तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर फेकली गेली आहे. झारखंडमध्ये विरोधकांना दोन अंकी जागाही मिळालेल्या नाहीत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या सहा महिन्यांपासून केलेले काम, लोकांची त्यांच्यावर असलेली श्रद्धा यांचा पक्षाच्या विजयात मोठे योगदान आहे.
मोदींमुळेच हे यश आहे. पूर्ण बहुमत असलेले सरकारच विकास करू शकते, असे वचन आम्ही झारखंडमधील जनतेला दिले होते. ते आम्ही पाळणार आहे. झारखंडमध्ये चांगले सरकार आम्ही देणार आहोत, असे ते म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.