पाटणा : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना मुस्लिम शिक्षक योगाचे शिक्षण देत आहेत. पाटण्यातील मोईनुल हक स्टेडियममध्ये शहा यांना मोहम्मद तमन्ना आणि अशोक सरकार हे योगाचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती बिहार-झारखंडमधील काम पाहणारे पतंजली योगपिठाचे अजित कुमार यांनी आज दिली.
जगभरातील विविध देशांमध्ये, २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
अजित कुमार म्हणाले, ‘तमन्ना या शहा यांना योगाच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स देत आहेत. रविशंकर प्रसाद, राजीव प्रताप रुडी, राधा मोहन सिंग आणि रामकृपाल यादव यांच्यासह केंद्रीय मंत्री योगाचे शिक्षण घेण्यासाठी येथे येत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.