अनुपम खेर यांनी भर कार्यक्रमात दिली शिवी

जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या समापन खूपच धमाकेदार राहिलं कारण साहित्यिकांच्या मंचावरून असं काही घडलं ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल.

Updated: Jan 26, 2016, 06:53 PM IST
अनुपम खेर यांनी भर कार्यक्रमात दिली शिवी title=

जयपूर : जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या समापन खूपच धमाकेदार राहिलं कारण साहित्यिकांच्या मंचावरून असं काही घडलं ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल.

फ्रिडम ऑफ एक्सप्रेशनवर सुरू असलेलं डिबेट एका राजकीय वादात बदलली आणि अनुपम खेर यांनी त्यांच्या भाषणात चक्क शिवीचा वापक करून टाकला.

अभिनेता अनुपम खेर हे अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर बोलत होते. त्यांनी म्हटलं की 'काय तुम्ही घरात .... बहीण या शब्दाचा वापर घरच्या व्यक्तींवर करता का ? मग देशाच्या व्यक्तींवर याचा वापर का करता.' त्यांच्या यावर वक्तव्यावर मग वादाला तोंड फूटलं.

कार्यक्रमात उपस्थित आम आदमी पक्षाच्या लोकांनी त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भाजपच्या कार्यकत्यांनी तेथे मोदी-मोदीचे नारे लगावण्यास सुरुवात केली. त्यानंतर खेर यांनी हात वर करुन त्यांचं समर्थन केलं. त्यामुळे वाद चांगलाच वाढला. आयोजकांनी ही हा राजकीय नाही तर साहित्यिकांचा मंच आहे असं सांगावं लागलं.