जम्मू-कश्मीर : भारतीय लष्कराने प्रत्यक्ष ताबा रेषेवर पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात गेल्या महिन्यात केरन क्षेत्रात सीमा रेषा ओलांडून चार पाकिस्तानी तळ नष्ट करण्यासाठी तोफा आणि बंदुकीचा वापर करण्यात आल्याची माहिती, सरकारी सूत्रांनी दिली.
2003मध्ये शस्त्रसंधी करार करण्यात आला. मात्र, पाकिस्तानकडून नेहमीच शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन करण्यात येत आहे. त्यामुळे नियंत्रण रेषवर प्राणघातक हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारतीय सैन्याने चोख प्रत्यत्तर दिले. भारतीय सैन्याने तोफांचा मारा करत पाकिस्तानातील 4 तळ काहीही थांगपत्ता लागू न देता उडवून दिलेत.
दरम्यान, गेले काही दिवस वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी रेंजर्सनी अखेर भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली आहे.पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर दिले. गेल्या 15 दिवसांत 60हून अधिकवेळा पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केले गेले. दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी मदत करण्यासाठी गोळीबार केला. मात्र बीएसएफच्या जवानांनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त केल्यात. भारतीय सेनेच्या या कारवाईमुळे अखेर पाकिस्तानी सैन्यानं सीमारेषेवर पांढरे झेंडे फडकवल्याचं एका लष्करी अधिकाऱ्यानं सांगितले. यामुळे सीमेवर अनेक दिवसानंतर शांतता पाहायला मिळत आहे.