जनलोकपालवर केजरीवाल ठाम...नायब राज्यपालांचा 'जंग'

जनलोकपालच्या मुद्द्यावरून आता केजरीवाल सरकार राहणार की जाणार हाच आता प्रश्न ऐरणीवर आलाय. कोणत्याही परिस्थितीत जनलोकपाल विधेयक मांडणारच असा पवित्रा केजरीवाल यांनी घेतलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2014, 01:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
जनलोकपालच्या मुद्द्यावरून आता केजरीवाल सरकार राहणार की जाणार हाच आता प्रश्न ऐरणीवर आलाय. कोणत्याही परिस्थितीत जनलोकपाल विधेयक मांडणारच असा पवित्रा केजरीवाल यांनी घेतलाय.
तर दुसरीकडे केंद्राची संमती असल्याशिवाय जनलोकपाल विधेयक मांडता येणार नाही, असं नायब राज्यपाल नजीब जंग यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहून स्पष्ट केलंय. विधेयक पटलावर आणण्यासाठी आवश्यक असलेली योग्य प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असं राज्यपालांनी म्हटलंय.
जनलोकपाल विधे.कावरून सरकार पडले तरी बेहत्तर. पण मागे हटणार नाही अशी भूमिका अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलीय. त्यामुळे आज केजरीवाल सरकारचं भवितव्य आज ठरण्याची शक्यता आहे.
केजरीवाल सरकार कायद्याच्या चिंधड्या उडवत असल्याची टीका दिल्ली भाजप नेते हर्ष वर्धन यांनी केलंय. आम आदमी पक्षानं घटनेत राहूनच काम करावं असंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, काँग्रेसनेही म्हटलं आहे की, आमचा जनलोकपालला पाठिंबा आहे. परंतु ते योग्य मार्गाने सादर करणे आवश्यक आहे. आवश्यक असलेली योग्य प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.