नवी दिल्ली : दिल्लीत भाजपनं मुख्यमंत्री पदासाठी किरण बेदींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी दिल्लीकरांचा ओपिनीयन पोल काही वेगळंच सांगतोय. झी न्यूज आणि तालीम यांनी केलेल्या सर्वेच्या आधारे दिल्लीकरांनी मुख्यमंत्रीपदासाठी अरविंद केजरीवाल यांनाच पसंदी दिली आहे.
केजरीवाल यांच्यानंतर भाजपच्या हर्ष वर्धन यांना दुसरी पसंती दिली आहे. ओपीनियन पोलनुसार किरण बेदी यांचा नंबर थेट तिसरा लागतोय. त्यामुळे भाजपला बेदी यांचा किती फायदा होईल, हे निवडणुकीनंतरच समजेल.
मात्र दुसरीकडे एका सर्चमध्ये अरविंद केजरीवाल यांना अजूनही दिल्लीत सर्वाधिक पसंती असल्याचं दिसून आलं आहे. अरविंद केजरीवाल यांना थोपवण्यासाठी किरण बेदी यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला असल्याचं सांगण्यात येत आहे.
किरण बेदी या दिल्लीच्या कृष्णानगरमधून निवडणूक लढवणार असल्याची माहिती शाह यांनी योवळी दिली. आज भाजपची निवडणूक समितीची बैठकीत पार पडली यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे शाह यांनी सांगितले.
बेदी यांनी चार दिवसापूर्वीच भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला होता. किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केत्याने आता दिल्लीत थेट किरण बेदी विरुध्द अरविंद केजरीवाल असा सामना पाहायला मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.