'भेट नाकारणाऱ्या मोदींना केजरीवालांना भेटायला बोलवावंच लागलंय'

वर्षभरापूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागल आहे.

Updated: Feb 12, 2015, 02:16 PM IST
'भेट नाकारणाऱ्या मोदींना केजरीवालांना भेटायला बोलवावंच लागलंय' title=

नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागल आहे.

७ मार्च २०१४ रोजीची ही घटना आहे. तेव्हा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींना केजरीवाल यांनी गुजरातच्या विकासाबाबत १६ प्रश्न विचारले होते. त्याबाबत चर्चा करण्यासाठी केजरीवाल गांधीनगरला जाऊन थडकले होते. मात्र तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांची अपॉइंटमेंटशिवाय भेट होऊ शकणार नाही, असं सांगत पोलिसांनी त्यांना अडवलं होतं.

आता मात्र दिल्लीमध्ये सनसनाटी बहुमत मिळवून मुख्यमंत्री होऊ घातलेल्या केजरीवालांना अखेर चहा पिण्यासाठी बोलावणं मोदींना भाग पडलंय. दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ७ रेस कोर्स रोड इथं भेट घेतली. 

या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटं चर्चा झाली. यावेळी केजरीवालांनी पंतप्रधानांना १४ तारखेच्या शपथविधी समारंभाचं आमंत्रण दिलं. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मनिष सिसोदिया यांनी दिली. सिसोदियादेखील या भेटीवेळी उपस्थित होते. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत केजरीवालांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावर आपण विचार करू, असं आश्वासन मोदींनी दिलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.