केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी

आपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याची दोन दिवस आधीच जोरदार तयारी सुरू झालीय.  

Updated: Feb 12, 2015, 03:01 PM IST
केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपद शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी title=

नवी दिल्ली : आपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी १४ फेब्रुवारीला दिल्लीतल्या रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलाय. या सोहळ्याची दोन दिवस आधीच जोरदार तयारी सुरू झालीय.  

आपच्या विधीमंडळ पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळ्याची जोरदार तयारी असून उत्तर दिल्ली महापालिका आणि दिल्लीचं सार्वजनिक बांधकाम खातं युद्धपातळीवर काम करत आहेत. शपथविधी सोहळ्याला रामलीला मैदानावर तब्बल ६० हजार जण उपस्थिती लावू शकतील, अशी व्यवस्था करण्यात येत आहे. 

यात ४० हजार जणांची बसण्याची सोय करण्यात आली आहेत. तर २० हजार लोक उभं राहून या सोहळ्याचे साक्षीदार होऊ शकतील. यात व्हीआयपींसाठी खास सोय करण्यात आलीय. २०१३ मध्ये केजरीवालांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीला एक लाख पेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावली होती. 

दरम्यान, वर्षभरापूर्वी केजरीवाल यांना भेट नाकारणाऱ्या नरेंद्र मोदी यांना अखेर त्यांना भेटायला बोलवावंच लागलंय. ७ मार्च २०१४ रोजीची ही घटना आहे. तेव्हा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या मोदींना केजरीवालांनी गुजरातच्या विकासाबाबत १६ प्रश्न विचारले होते. त्याबाबत चर्चा करण्यासाठी केजरीवाल गांधीनगरला जाऊन थडकले होते. मात्र तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या मोदींची अपॉइंटमेंटशिवाय भेट होऊ शकणार नाही, असं सांगत पोलिसांनी त्यांना अडवलं होतं. 

आता मात्र दिल्लीमध्ये सनसनाटी बहुमत मिळवून मुख्यमंत्री होऊ घातलेल्या केजरीवालांना अखेर चहा पिण्यासाठी बोलावणं मोदींना भाग पडले आहे. दिल्लीचे नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ७ रेस कोर्स रोड इथं भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे १५ मिनिटं चर्चा झाली. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत केजरीवालांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यावर आपण विचार करू, असं आश्वासन मोदींनी दिले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.