पाणगरिया यांनी स्वीकारला 'नीती आयोगा'चा पदभार

देशाच्या विकासाची दिशा ठरवणा-या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपाचा कार्यभार अरविंद पाणगरिया यांनी आजपासून हाती घेतलाय. 

Updated: Jan 13, 2015, 11:22 AM IST
पाणगरिया यांनी स्वीकारला 'नीती आयोगा'चा पदभार title=

नवी दिल्ली : देशाच्या विकासाची दिशा ठरवणा-या नीती आयोगाच्या उपाध्यक्षपाचा कार्यभार अरविंद पाणगरिया यांनी आजपासून हाती घेतलाय. 

सकाळीच नवी दिल्लीतल्या नीती आयोगाच्या कार्यालयात त्यांनी पदाची सूत्रं हाती घेतली. वर्षानुवर्षे देशाचं आर्थिक नियोजन करणारा नियोजन आयोग बरखास्त करून त्या जागी नीति आयोग अस्तित्वात आलाय. पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असणार आहेत. 

आयोगावर अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय, डीआरडीओचे माजी प्रमुख व्ही. के. सारस्वत हे पूर्णवेळ सदस्य असतील. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरूण जेटली, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि कृषीमंत्री राधा मोहन सिंग हे पदसिद्ध सदस्य असतील. तर नितीन गडकरी, स्मृती इराणी आणि थावरचंद गेहलोत हे पहिल्या आयोगात विशेष निमंत्रित असणार आहेत.

अरविंद पाणगरिया यांची थोडक्यात ओळख:- 
- अरविंद पाणगरिया ख्यातनाम अर्थतज्ज्ञ, मुक्त अर्थव्यवस्थेचे पुरस्कर्ते

- अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्रोफेसर

- एशियन डेव्हलपमेंट बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ वर्ल्ड बँक, आयएमएफ, डब्ल्यूटीओमध्ये विविध पदांवर कामाचा अनुभव

- मेरीलँड विद्यापीठाच्या इंटरनॅशनल इकोनॉमिक्स सेंटरचे सह संचालक

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.