नवी दिल्ली : पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना निव़डणूक आयोगाने दणका दिलाय.
तुमची खासदारकी का रद्द करू नये? अशी नोटीस निवडणूक आयोगाने दिली आहे. निवडणूक खर्च वेळेत न दिल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे. २० दिवसांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीचा खर्च अशोक चव्हाण यांनी 2009 साली खर्च दिला नसल्याची तक्रार होती.
तसेच त्यांनी न्यूज पेपरला दिलेली अशोक पर्व ही जाहिरात पेड न्यूज असल्याची ही तक्रार होती. माधव किन्हाळकर यांनी अशोक चव्हाण यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.