‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत. 

PTI | Updated: Jul 13, 2014, 10:48 AM IST
‘ब्रिक्स’ परिषदेसाठी मोदी आज ब्राझीलला title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अमेरिका) या पाच देशांच्या शिखर परिषदेसाठी ब्राझीलला रवाना होत आहेत. 

14 ते 15 जुलैदरम्यान आयोजित या परिषदेत एक विकास बँक स्थापन करण्याच्या योजनेला अंतिम रूप देण्यासह संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटनांमध्ये सुधारणांसाठी आवाज उठवला जाण्याची शक्यता आहे.
मोदींची पाश्चिमात्य देशांतील बहुपक्षीय व्यासपीठावर ही पहिली उपस्थिती असेल. पंतप्रधानपदी आरूढ झाल्यानंतर मोदी यांनी भुतानचा दौरा केला होता़ मात्र, सार्क देशांबाहेर मोदींचा हा पहिला विदेश दौरा असेल़

काय आहे ब्रिक्स?

 

  • जगातील पाच उगवत्या देशांचा गट. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश.
  • वरील सर्व देश जी-२० गटाचे सदस्य.
  • २००८ मध्ये रशियात पहिली बैठक.
  • प्रख्यात अर्थतज्ज्ञ जिम ओ नील यांच्या पुस्तकावरून ब्रिक हे नाव घेण्यात आले. 'बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स' असं त्यांनी म्हटलं होतं.
  • यंदाच्या बैठकीत अर्जेंटिनाचाही गटात समावेश. इजिप्त, इराण, सीरिया आणि नायजेरियाही गटात येण्यास उत्सुक.
  • सहाव्या बैठकीचे महत्व
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.