भूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले

भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

PTI | Updated: Apr 26, 2015, 04:07 PM IST
भूकंपामुळे भारतात ५१ जणांचा मृत्यू, बिहारमधील ३८ जण दगावले title=

नवी दिल्ली: भयंकर भूकंपानं शनिवारी देशातील विविध भागांमध्ये कमीतकमी ५१ जणांचा मृत्यू झालाय. तर जवळपास २३७ जण जखमी झाले आहेत. या धक्क्यांमुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता.

७.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे भारतातील सर्वाधिक प्रभावित झालेलं राज्य म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल... ज्यांच्या सीमा  नेपाळला लागलेल्या आहेत.

केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजूनं पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, भारतात सर्वात जास्त फटका बिहारला बसलाय. बिहारमध्ये ३८ जणांचा मृत्यू झालाय तर १३३ जण जखमी झाले आहेत. 

उत्तर प्रदेशमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून ६९ जण जखमी झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ५५ जण जखमी झाले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: परिस्थितीवर नजर ठेवून आहेत आणि दिशानिर्देश देत आहेत. प्रभावित क्षेत्रामध्ये बचावकार्य आणि मदतीचं अभियान युद्धपातळीवर सुरू केलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.