नवी दिल्ली : मोदी सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी दिलेय. स्वयंपाकाच्या अनुदानित सिलिंडर दरात ४२ रुपयांनी कपात केली आहे. तर एटीएफ तसेच जेट इंधनाच्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, विनाअनुदानित रॉकेलच्या दरात ५४ पैशांची वाढ झाली असून ते आता प्रति लिटर ४३.१८ रुपये झाले आहे.
केंद्र सरकारने सलग चौथ्या महिन्यात सिलिंडरच्या दरात कपात केलेय. बुधवार मध्यरात्रीपासून नवीन दर लागू करण्यात आलेत. १ ऑक्टोंबरपासून नागरिकांना आता स्वस्तात गॅस सिलिंडर मिळणार आहे.
नवी दिल्ली येथे एटीएफच्या दरात प्रति किलो २,२४५.९२ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन दर ४३,१८४.१६ प्रति किलो लिटर झाले आहेत. याबाबत तेल वितरण कंपन्यांकडून घोषणा करण्यात आलेय. प्रत्येक राज्यात स्थानिक विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर (व्हॅट) वेगवेगळा असल्याने विविध विमानतळांवर दर वेगवेगळे आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.