शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तील अग्रलेखात म्हटलं आहे की, 'पाकिस्तानने सीमा भागातील १३ गावांवर हल्ले केले. जम्मूमध्ये 22 चौकीवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन जण ठार झालीत आणि काही जण जखमी झालीत. यामुळे अनेक लोकांना गावं सोडावी लागली. 2003 नंतर ही आपल्याकडील सर्वात मोठी घटना आहे. मागील एक महिन्याच्या दरम्यान पाकिस्तानने भारतावर २५ हल्ले केले, पण आम्ही भिजलेल्या फटाक्यासारखे चुपचाप बसलो आहोत.'
उद्धव ठाकरेंनी म्हटलं की अशा स्थितीत पाकिस्तान सोबत चर्चा किंवा बैठका करणे व्यर्थ आहे. भारताने पाकिस्तानच्या सचिवांसोबतची चर्चा स्थगित करून नाराजी जाहीर केली आहे. पण हे पुरेसं नाही आहे. आता आपल्याला पाकिस्तानच्या सीमा भागात घुसून त्यांना धडा शिकवला पाहिजे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.