पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट हाणून पाडला

पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर हल्ला करण्याचा किंवा दिल्लीत एखाद्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट लश्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेनं रचला होता. 

Updated: Dec 6, 2015, 06:56 PM IST
पंतप्रधान मोदींवर हल्ल्याचा कट हाणून पाडला title=

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर हल्ला करण्याचा किंवा दिल्लीत एखाद्या मोठ्या नेत्याच्या हत्येचा कट लश्कर-ए-तोयबा या दहशदवादी संघटनेनं रचला होता. 

भारतीय गुप्तचर संस्थेला याची माहिती मिळाली होती की 4 दहशदवादी हे जम्मू-काश्मिरच्या सीमा भागातून देशात घुसखोरी करणार आहेत. त्यानंतर आईबी आणि दिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं दोन दहशदवाद्यांना पकडलं आणि त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांचा हा सगळा कट लक्षात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत लोकांवर ग्रेनेड हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींची सुरक्षा कवच न भेदू शकल्यास स्वत:ला उडवून टाकण्याचा त्यांनी कट रचला होता. पण त्याआधीच या दहशदवाद्यांना अटक करून त्यांचा हा कट भारतातील सुरक्षा यंत्रणांनी हाणून पाडला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.