www.24taas.com,नवी दिल्ली
बाबा रामदेव पुन्हा एकदा रामलीला मैदानावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काळ्याधनाविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारला पूर्णवेळ दिला गेला होता. आज सायंकाळपर्यंत पंतप्रधानांनी कारवाई केली नाही तर महाक्रांती होईल, एल्गार बाबांनी रविवारी केला आहे.
आंदोलनाच्या नव्या रणनितीची घोषणा करताना म्हटले, कोणताही पक्ष काळापैसा, भ्रष्टाचार आणि व्यवस्था परिवर्तनाच्या मुद्यावर आम्हाला समर्थन देत असेल तर त्यांचे या मंचावर स्वागत आहे. सोमवारपर्यंत या मुद्यांवर समर्थन देण्यासाठी देशातील सर्व पक्ष या मंचावर येऊ शकतात, असा दावा बाबा रामदेव यांनी केला.
पंतप्रधानजी व्यक्तिगतरित्या तुम्ही इमानदार आहात, त्यावर आम्हाला कोणतीही टीका-टीपण्णी करायची नाही. मात्र, काळ्याधनाबाबत आज सायंकाळपर्यंत ठोस निर्णय घेतला गेला नाही तर, तुम्ही राजकीयदृष्टया इमानदार नाही असे स्पष्ट होईल. जर तुम्ही कोणताही निर्णय जाहीर केला नाही तर, उद्या रामलीला मैदानवर आंदोलन होईल आणि ते देशभर पसरले, असा इशारा त्यांनी दिला.