बाबा भरणार ३५ करोड रुपयांचा इन्कम टॅक्स!

योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 29, 2012, 04:31 PM IST

www.24taas.com, हरिद्वार
योगगुरू बाबा रामदेव यांना ७० करोड रुपयांच्या मिळकतीवर ३५ करोड रुपयांचा मिळकत कर (इन्कम टॅक्स) लावला गेलाय. ही माहिती खुद्द बाबा रामदेव यांनीच दिलीय. केंद्र सरकार माध्यमांच्या मार्फत आपल्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोपही यावेळी बाबांनी केलाय.
सरकारला ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ सुचलीय. त्यामुळेच आता रोज रोज नवे आरोप ठेवणाऱ्या केंद्र सरकारला पतंजलि योग पीठाला दान म्हणून मिळालेला पैसा योगपीठाचं उत्पन्न म्हणून दिसतोय आणि सार्वजनिक सेवा ‘व्यापार’ म्हणून पाहिलं जातंय. पंतप्रधानांन लक्ष्य करत रामदेवांनी आता आपली लढाई ‘टॉप’शी असेल प्याद्यांशी नाही अशी घोषणाही यावेळी केलीय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी कॅग रिपोर्ट समोरकरत कोळश्यात हात काळे झालेलं सरकार जगभरात भारताचं नाव बदनाम झाल्यानंतरही थंड आहे तर मग ईमानी कोण? असा सवाल बाबांनी केलाय.
‘१९९५ पासून आम्ही सरकारला कवडी-कवडीचा हिशोब देतोय, पण आता आंदोलनामुळे घाबरलेलं सरकार सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत आमच्यावर कारवाई करतंय’ असं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.