गुजरातमध्ये विक्रम, ३९५७ महिला खेळल्या बुद्धिबळ

बुधवारी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 29, 2012, 10:31 PM IST

www.24taas.com, अहमदाबाद
बुधवारी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुजरातमध्ये नरेंद्र मोदी सरकारद्वारे महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
महिला खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं यासाठी गुजराथमध्ये सरकारतर्फे महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत ३९५७ महिलांनी भाग घेतला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलांनी एकसाथ बुद्धिबळ खेळण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे या स्पर्धेची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या ३९५७ महिलांपैकी १४९ महिला नेत्रहीन होत्या. या सर्व स्पर्धेला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तसंच बुद्धिबळातील ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंदही उपस्थित होते.