नवी दिल्ली : रेल्वेच्या तत्काल तिकिटावर यात्रा करण्यासाठी आता ओळख पत्र म्हणून, राष्ट्रीयीकृत बँकेचं फोटो पासबुक तसेच क्रेडिट कार्डही मान्य केलं जाणार आहे.
रेल्वेने तत्काल तिकिटासाठी आवश्यक असणाऱ्या ओळख पत्राच्या नियमात बदल केला आहे.
बदलानुसार तत्काल तिकिट, काऊंटर किंवा इंटरनेटवरून बुक करतांना जे ओळखपत्र नमूद करण्यात आले आहे, त्याची झेरॉक्स कॉपी दाखवण्याची गरज पडणार नाही.
तुमचं ऑनलाईन तिकिट बुक करतांना, तुम्हाला ओळखपत्र किंवा त्याचा नंबर नमूद करण्याची गरज नसेल.
जर एकापेक्षा जास्त प्रवासी एकाच तिकिटावर नमूद असतील तर त्यापैकी एकाच प्रवाशाने ओळखपत्र दाखवलं तरी चालणार आहे.
ओळख पत्र
बदललेल्या नियमानुसार खालील पैकी कोणताही एक पुरावा, ओळख पत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
1) मतदान कार्ड
2) पासपोर्ट
3) पॅनकार्ड
4) ड्रायव्हिंग लायसन्स
5) आधार कार्ड
6) फोटो आयकार्ड (केंद्र किंवा राज्य सरकारचे, नंबरसह)
7) फोटो आयकार्ड (जिल्हा, तहसिल प्रशासन, ग्राम पंचायतकडील कार्ड, नंबरसह)
8) मान्यता प्राप्त शाळा आणि कॉलेजचं विद्यार्थी ओळख पत्र
9) राष्ट्रीयीकृत बँकचं फोटोसह पासबूक
10) बँकेकडून जारी करण्यात आलेलं फोटोसह क्रेडिटकार्ड
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.