जम्मू -काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, ४ जवान जखमी

जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात चार जवानांसह आठ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

PTI | Updated: Jul 29, 2015, 02:28 PM IST
जम्मू -काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला, ४ जवान जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात चार जवानांसह आठ जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत.

अनंतनाग-पहलगाम या मार्गाचा वापर अमरनाथ यात्रेसाठी केला जातो. अज्ञात व्यक्तींनी ग्रेनेड हल्ला केला. यावेळी रस्त्यावरून जाणारे जवान आणि नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या हल्ल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. हल्ल्याची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.