मुंबई : आज अक्षय तृतीयेच्या दिवशी अनेक लोकं सोने खरेदीला अधिक पसंती देतात. मात्र सोने खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ शकते.
अनेक ठिकाणी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने स्वस्त सोने खरेदीची जाहिरात केली जाते. या जाहिरातीत सोनं १८ हजार ते २२ हजार रूपये प्रतितोळा भावाने उपलब्ध असल्याचं सांगितलं जातं.
मात्र, प्रत्यक्ष बाजारात सोन्याची किंमत ही २६ ते २७ हजार रूपये प्रतितोळा आहे. त्यामुळे स्वस्त सोने खरेदी करताना सावधान रहा... 'कंन्ज्युमर असोसिएशन ऑफ इंडिया'च्या सर्व्हेनुसार नॉन हॉलमार्क दागिने खरेदीत सोनं ६० टक्क्यांपेक्षा कमी असू शकते.
सोनं खरेदी करताना लोकं २२ कॅरेटच्या दागिन्यांना पसंती देतात, तर १८ कॅरेटचे दागिने त्याहून स्वस्त असतात. २२ कॅरेटमध्ये ९१.५ टक्के सोनं आणि ८.४ टक्के कॉपर असतं, तर १८ कॅरेटमध्ये सोनं ६५ टक्के असतं.
मात्र, स्वस्त सोने खरेदीच्या नादात दुकानदार ग्राहकांना २२ कॅरेटचं सोनं भासवून, १८ कॅरेटपेक्षाही कमी शुद्धतेचे दागिने विकतात. त्यामुळे दागिने खरेदी करताना ट्रेडमार्क पाहावा.
तसंच सर्टिफिकेटमध्ये सोन्याची कॅरेट क्वालिटीही तपासून पाहावी. तसंच सोन्याच्या दागिन्यात असलेल्या रत्न खड्यांकरता एक वेगळं सर्टिफिकेटदेखील असतं, ते तपासून पाहा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.