नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याऱ्या मंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला

मंत्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो थाटमाट आणि जबरदस्त पोलीस बंदोबस्त... मात्र याच मंत्र्यांना त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह सळो की पळो करुन सोडलं...  हा प्रकार झाला तेलंगणात.... 

Updated: Apr 18, 2015, 07:07 PM IST
नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्याऱ्या मंत्र्यांवर मधमाशांचा हल्ला title=

करीमनगर, तेलंगणा: मंत्री म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो थाटमाट आणि जबरदस्त पोलीस बंदोबस्त... मात्र याच मंत्र्यांना त्यांच्या पोलीस बंदोबस्तासह सळो की पळो करुन सोडलं...  हा प्रकार झाला तेलंगणात.... 

अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी गेलेल्या मंत्र्यांवर मधमाशांनी हल्ला केला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं तेलंगणाला झोडपून काढलं. पावसानं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तेलंगणाचे अर्थमंत्री एटेला राजेंद्र आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री केटी रामाराव तेलंगणाच्या करीमनगर मधील एका आंब्याच्या बागेत गेले. मात्र आपल्या लवाजम्यासह आलेल्या या पाहुण्यांवर बागेतील मधमाशांनी हल्ला चढवला. 

अचानक झालेल्या या हल्लयापासून जीव वाचवण्यासाठी या मंत्रीमहोदयांनी तिथून धूम ठोकली. गंमत म्हणजे या मंत्री महोदयांच्या रक्षणासाठी सशस्त्र पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. मात्र मधमाशांच्या हल्ल्यापुढे सारे जण हतबल झाले. हा हल्ला इतका भयानक होता की मंत्रीमहोदयांना तोंडहीवर करता आलं नाही.

पाहा हा व्हिडिओ -

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.