'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

Updated: Sep 8, 2015, 09:57 AM IST
'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात title=

अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमध्ये सध्या एक पोस्टर चर्चेत आहे. मुख्यमंत्री आनंदी बेन पटेलसोबत मुस्लिम चिन्ह असलेला फोटो आणि हा फोटो ज्या पोस्टरवर लागलाय त्यात कुराणमधील संदेश असल्याचं सांगितलंय. 

गुजरातच्या गौसेवा आणि गौचर विकास बोर्डानं हे पोस्टर लावलंय. त्यात लिहिलंय, कुराणात 'गौ रक्षाबद्दल सांगितलंय. जन्माष्टमी निमित्तानं मुस्लिमांना शुभेच्छा देण्यासाठी या पोस्टरचा वापर केलाय. याद्वारे बीफ न खाण्याचा सल्लाही देण्यात आलाय.'

प्रश्नचिन्ह उपस्थित

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार पोस्टरमध्ये म्हटलं गेलंय की, कुराणात सांगितलंय बीफ खाल्ल्यानं अनेक प्रकारचे आजार होतात. सर्वांनी गायीचा सन्मान करायला हवा. 

यासंबंधी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मुफ्ती अहमद देवलावी यांनी सांगितलं, 'कुराणात असा कोणताही उल्लेख नाही. हा मुस्लिमांना गोंधळात टाकण्याचा कट आहे.'

२० पानांमध्ये करण्यात आले भाषांतरित

एक दुसरे मुस्लिम नेते गुलाम मोहम्मद कोया यांनी सांगितलं, कुराणात असं काहीच लिहिलेलं नाही. तर दुसरीकडे गौसेवा आणि गौचर विकार बोर्डाचे चेअरमन डॉ. वल्लभभाई कठीरिया यांनी सांगितलं, 'मला २० पानांच्या कुराणाचं भाषांतर मिळालंय, जे हिंदी आणि गुरजारीतमध्ये आहे.'

आणखी वाचा - दोनपेक्षा जास्त मुलं असणाऱ्या मुस्लिमांना शासकीय लाभ नको - तोगडीया

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.