दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा

मध्यप्रदेशमध्ये अवघ्या दीड वर्षांचा एक चिमुरड्यावर एकटं तुरुंगात राहण्याची वेळ आलीय.

Updated: Aug 18, 2015, 03:31 PM IST
दीड वर्षांचा चिमुरडा तुरुंगात; भोगतोय आईच्या गुन्ह्याची शिक्षा title=

भोपाळ : मध्यप्रदेशमध्ये अवघ्या दीड वर्षांचा एक चिमुरड्यावर एकटं तुरुंगात राहण्याची वेळ आलीय.

पतीच्या हत्येत दोषी ठरलेल्या आईसोबत आयुष अहिरवार या चिमुरड्याची तुरुंगात एन्ट्री झाली होती. त्यानंतर काही दिवसांनीच त्याच्या आईनं तुरुंगातच विष प्राशन केलं. तिला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर गेल्या आठवड्याभरापासून आई-वडिलांना पोरका झालेला हा चिमुरडा आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. 

आईच्या मृत्यूनंतर आयुषची कस्टडी जेल विभागाकडे आहे. त्याचा ताबा मिळवण्यासाठी आजी-आजोबा रामप्रसाद अहिरवार आणि आनंदीबाई तुरुंगाचे उंबरे झिजवत आहेत. त्यासाठी त्यांनी कोर्टाकडेही आयुषच्या ताब्याची मागणी केलीय. मात्र, आयुषसंबंधी कोर्टाचा निर्णय आल्यानंतर लगेचच त्याला त्याच्या कुटुंबियांकडे सोपवलं जाईल, असं जेल प्रशासनाचं म्हणणं आहे. 

आयुषच्या आईनं सरस्वतीनं आपल्याच बेवड्या नवऱ्याची हत्या केली होती. तिचा नवार विकास यादव हा एका कुरिअर कंपनीत कामाला होता. जून २०१५ मध्ये रोजच्या कटकटीला कंटाळून सरस्वतीनं विकासला मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. सरस्वतीला आयुष (दीड वर्ष) आणि आशु (पाच वर्षांचा) अशी दोन मुलं आहेत. सरस्वती हत्येच्या आरोपाखाली दोषी ठरल्यानंतर दीड वर्षांच्या चिमुरड्यालाही तुरुंगात जावं लागलं. पण, वयानं मोठ्या असल्यानं आशु मात्र आपल्या आजी-आजोबांसोबत राहतोय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.