बिहार विधानसभा निवडणूक तारखा आज जाहीर होणार?

येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणgकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

PTI | Updated: Sep 8, 2015, 10:17 AM IST
बिहार विधानसभा निवडणूक तारखा आज जाहीर होणार? title=

नवी दिल्ली : येत्या काही दिवसात बिहारमधल्या विधानसभा निवडणgकीच्या तयारी संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाची आज अत्यंत महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर आज संध्याकाळीच बिहारच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. 

बिहारमधल्या निवडणुका पाच टप्प्यात होतील अशी चर्चा आहे. त्यात नवरात्र आणि दिवाळी आल्यामुळे या निवडणूकांच्या टप्पे वाढण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. 

बिहारमध्ये नीतिशकुमार, लालूयादव आणि काँग्रेसनं केलेली महाआघडी आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात लढणारी भाजप यांच्यात थेट टक्कर होणार आहे. मोदी सत्तेत आल्याला आता दीड वर्ष पूर्ण होतंय. त्या पार्श्वभूमीवर बिहारमधला विजय मोदींसाठी महत्वाचा आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.