रायपूर : छत्तीसगडमधील बिलासपूर इथं नसबंदी करण्यात आलेल्या १३ महिलांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. पण, याच प्रकरणात आता एका धक्कादायक माहिती समोर येतेय.
राज्यच्या आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी डॉ. आलोक शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, नसबंदी करण्यात आल्यानं नाही तर झिंक फॉस्फाईड मिश्रित औषधांमुळे या महिलांचा मृत्यू झालाय. झिंक फॉस्फाईडचा वापर उंदीर मारण्याच्या औषधांमध्ये केला जातो.
बिलासपूर इथल्या रुग्णालयात शनिवारी सरकारी नसबंदी शिबीरादरम्यान ८३ महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यापैंकी काही जणींना ताप आला तर काहींना वेदना होऊ लागल्या. त्या महिलांची प्रकृती बिघतच गेली आणि सोमवारी तब्बल १३ महिलांनी आपले प्राण गमावले होते.
नसबंदी शस्त्रक्रियेनंतर फार्मा प्रा. लि. द्वारे तयार करण्यात आलेल्या ‘सिप्रोसिन’च्या ५०० टॅबलेट महिलांना खाण्यासाठी देण्यात आल्या होत्या. या कंपनीत छापा मारल्यानंतर तिथं उंदीर मारणारी औषधं सापडली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.