नवी दिल्ली : राम मंदिरावर ऑफर देत भाजप नेता सुब्रम्हण्यम स्वामी यांनी नव्या वादाला तोंड फोडलंय. मुसलमानांसाठी आम्ही भगवान श्रीकृष्णाचे पॅकेज देत असल्याचं ट्विट स्वामी यांनी केलंय.
तुम्ही आम्हाला फक्त ३ मंदिरं द्या आणि त्या बदल्यात ३९ हजार ९९७ मशिदी तुम्हाला ठेवा असं स्वामींनी ट्विटमध्ये नमूद केलंय. मला आशा आहे की मुस्लिम नेता दुर्योधन नाही बनणार असंही ट्विटमध्ये स्वामींनी म्हटलंय.
शनिवारी दिल्ली विद्यापीठाच्या राम मंदिराबाबतच्या शिबिरातही स्वामींनी मंदिराबाबत ठाम असल्याचं म्हटलं होतं. तसंच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी राम मंदिराला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं असा दावाही स्वामींनी केला होता.