भोपाळ : रेल्वे आता कात टाकणार असल्याचं दिसून येत आहे. रेल्वे आपले कोच अधिक आरामदायक आणि आकर्षक बनवणार असल्याचं दिसून येतंय.
भोपाळच्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त अशा २४ नवीन कोचची निर्मिती करण्यात आली आहे. या नव्या डब्यांमुळे भारतीय रेल्वे लवकरच कात टाकेल अशी आशा आहे.
डब्यातील बाकडी आकर्षक रंगांमध्ये तयार केली आहेत. आसनव्यवस्थेत काही बदल करून ती अधिक आरामदायी बनविली गेली आहे. शिवाय टॉयलेटही अधिक स्वच्छ आणि अत्याधुनिक आहेत.
हे कोच रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंच्या हस्ते रेल्वेला सुपूर्द केले जाणार आहेत. हे नवे कोच संपूर्ण भारतीय बनावटीचे असून, हे कोच तयार करण्यापूर्वी पाच वर्षे या संदर्भात संशोधन करण्यात आले आहे.