जम्मू : जम्मू - काश्मीर विधानसभेत गुरुवारी जे झालं ते पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय... एमएलए हॉस्टेलमध्ये 'बीफ पार्टी'चं आयोजन करणाऱ्या एका आमदाराला भाजपच्या आमदारानं विधानसभेतच कानाखाली ठेवून दिली.
अपक्ष आमदार इंजिनिअर राशिद यांनी 'बीफ पार्टी' दिल्यानं त्यांच्यावर नाराज झालेल्या भाजपच्या आमदारांनी त्यांना विधानसभेतच मारहाण केली. हे सगळं सदनाची कारवाई सुरू असताना घडलं.
ही मारहाण रोखण्यासाठी मार्शलला मध्ये पडावं लागलं... पण, हा हंगामा काही थांबण्याचं नाव घेईना.
राशीद यांना कानाखाली लगावणाऱ्या भाजप आमदाराचं नाव रवींद्र रैना असल्याचं सांगण्यात येतंय.
या दुर्व्यवहाराविरोधात नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांना सदनातून 'वॉक आऊट'ही केलं.
उल्लेखनीय म्हणजे, विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता यांनी ज्या हॉटेलमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती त्या हॉटेलच्या मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजरला तात्काळ निलंबित करून टाकलंय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.