भाजपचे कॅम्प हिंदू दहशतवाद्यांसाठी - सुशीलकुमार शिंदे

भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 20, 2013, 03:14 PM IST

www.24taas.com,जयपूर
भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चालविण्यात येणारे कॅम्प हे हिंदू दहशतवाद्यांसाठीच असल्याचे, वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे केले. दरम्यान, काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा हल्ला भाजपने चढविला आहे.
जयपूर येथे सुरु असलेल्या चिंतन शिबिरात ते बोलत होते. यावेळी शिंदे यांनी आरएसएसवर गंभीर आरोप केला. देशात झालेल्या समझौता, मक्का मशिद आणि मालेगाव स्फोटांमागे आरएसएसचा हात होता. सरकारकडे याबाबत पुरावे आहेत. आरएसएस स्वतःच बॉम्ब लावते आणि नंतर अल्पसंख्यांकांवर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप करते. आरएसएसकडून चालविण्यात येणारे कँप हे हिंदू दहशतवादाला खतपाणी घालत आहे, असे विधान सुशीलकुमार यांनी केले.
शिंदे या खळबळजनक आरोपांवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दहशतवादामुळे लोक मरत आहे आणि काँग्रेस याचे भांडवल करीत आहे. तर भाजपचे प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी शिंदे यांचे वक्तव्य दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. आरोप बिनबुडाचे आहेत. काँग्रेसने माफी मागावी अन्यथा गंभीर परिणामाला सामारे जावे, अशा इशारा यावेळी भाजपने दिलाय.

काँग्रेसच दहशतवाद्याला खतपाणी खालत आहे. देशाच्या गृहमंत्र्यांने असे व्यक्तव्य करणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्राचे असल्याचे लाज वाटते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेने व्यक्त केलीय.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या विधानानंतरच्या आक्षेपानंतर सारवासारव केली आहे. मी असे काही म्हणालो नाही. माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. मी भगवा दशहतवाद सुरू आहे, असे म्हटल्याचे त्यांनी म्हटले.