पाटणा : बिहारच्या सीवानमध्ये भाजपचे विधान परिषदेचे सदस्य टुन्ना पांडेय यांना एका मुलीची छेडछाड केल्याप्रकऱणी अटक करण्यात आलीये.
एक्सप्रेसमध्ये महिलेची छेड काढल्याच्या तक्रारीनंतर रविवारी सकाळी त्यांना अटक कऱण्यात आली. पूर्वाचल एक्सप्रेसच्या एसी टू बोगीए-१मधून ते प्रवास करत होते.
यावेळी शेजारी आपल्या वडिलांसोबत बसलेल्या १२ वर्षाच्या मुलीने हा आरोप केलाय. याप्रकरणी पांडेयच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय.
दरम्यान, याप्रकरणी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेय. पांडेयने मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा केलाय.