भाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी

उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

Updated: Apr 15, 2016, 04:33 PM IST
भाजपची वादग्रस्त पोस्टरबाजी title=

लखनऊ: उत्तर प्रदेशचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी बनवण्यात आलेल्या पोस्टरमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

केशव प्रसाद मौर्या झाले कृष्ण

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर केशव प्रसाद मौर्या पहिल्यांदाच काशीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधी त्यांच्या स्वागताच्या पोस्टरमध्ये मौर्यांना कृष्ण दाखवण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशला या पोस्टरमध्ये द्रौपदी दाखवण्यात आलं आहे, तर कृष्णाच्या रुपात दाखवलेले केशव प्रसाद द्रौपदीचा बचाव करत आहेत. 

विरोधकांकडून वस्त्रहरण

राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव, आजम खान आणि औवेसी हे या पोस्टरमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करताना दाखवण्यात आले आहेत. 

भाजपचा कार्यकर्त्यांना सल्ला

दरम्यान या पोस्टरबाजीवरून भाजपनं असे पोस्टर बनवू नका असा सल्ला दिला आहे. समाजवादी पार्टीनं मात्र भाजपच्या या पोस्टरबाजीवर टीका केली आहे. आधी भाजपनं रामाच्या नावानं राजकारण केलं, आता द्रौपदीच्या नावाचं राजकारण करत आहे, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीनं दिली आहे.