मुंबई : भाजयुमोची कार्यकर्ता असलेल्या तरूणीसोबत मथुरेत नेमकं काय झालं, हे त्या तरूणीने तरुणीने भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांना पत्र लिहिले होते.
या पत्रात त्या तरूणीने आपल्यावर काय प्रसंग ओढवला, याविषयी लिहिले आहे. या तरूणीने लिहिलेलं पत्र जसेच्या तसे खाली देत आहोत. हे पत्र वाचल्यानंतर तुमच्या अंगावरही काटे येतील.
भारतीय जनता युवा मोर्चाचा मुंबई शहराध्यक्ष गणेश पांडे याच्याविषयी हे पत्र आहे. पक्षातील एक सहकारी तरुणीने त्याच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली होती.
देशभरातील भाजयुमोच्या संघटनेची राष्ट्रीय पातळीवर एक परिषद, ४ मार्च रोजी मथुरा येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेसाठी मुंबई भाजयुमोचा अध्यक्ष गणेश पांडेसह संबंधित तरुणी सहभागी झाली होती.
परिषदेसाठी सर्व कार्यकर्ते एका हॉटेलात थांबले होते. त्याच रात्री पांडेने आपल्याला त्याच्या खोलीत बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अश्लील भाषेचा वापर करत आपला विनयभंग केला, अशी तक्रार तरुणीने शेलार यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.