सर्व्हर फेल, रेल्वेची परीक्षा रद्द

टीएमयूमध्ये सोमवारी झालेल्या रेल्वेच्या ग्रुप-सीची परीक्षा रद्द करण्यात आलीय. सर्व्हर डाऊन झाल्यानं बोर्डानं हा निर्णय घेतलाय. 

Updated: Mar 29, 2016, 05:43 PM IST
सर्व्हर फेल, रेल्वेची परीक्षा रद्द title=

नवी दिल्ली : टीएमयूमध्ये सोमवारी झालेल्या रेल्वेच्या ग्रुप-सीची परीक्षा रद्द करण्यात आलीय. सर्व्हर डाऊन झाल्यानं बोर्डानं हा निर्णय घेतलाय. 

रेल्वे भर्ती बोर्डानं परीक्षेसाठी २३ केंद्र बनवले होते. मुरादाबादमध्ये सोमवारी टीएमयूमध्ये तीन वर्गांत परीक्षा पार पडणार होती. बोर्डानं 'टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस'कडे परीक्षेची जबाबदारी सोपवली होती. 

या परीक्षेसाठी अनेक ठिकांणांहून उमेदवार दाखल झाले होते. सोमवारी सकाळी सात वाजता परीक्षा सुरू झाली... पण, सर्व्हर डाऊन झाला आणि उमेदवारांना परीक्षा न देताच बाहेर पडावं लागलं. अव्यवस्थेवर भडकलेल्या उमेदवारांनी हायवेवर जाम केला आणि रेल्वे भर्ती बोर्डाविरुद्ध नारे लगावले. यानंतर ही परीक्षाच रद्द करण्यात आली. 

सूत्रांच्या माहितीनुसार ही परीक्षा आता मे महिन्यामध्ये पुन्हा होणार आहे.