www.24taas.com, झी मीडिया, पटना
रविवारी पहाटे पहाटे बिहारस्थित बोधगया महाबोधी मंदिराचा परिसर एकापाठोपाठ झालेल्या बॉम्बस्फोटांमुळे हादरलाय. सर्वपरिचित अशा महाबोधी मंदिराजवळच नऊ स्फोट झालेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या स्फोटात चार लोक जखमी झालेत.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार...
- बोधगया मंदिर परिसरात एक जिवंत बॉम्ब सापडला.
मंदिराला मात्र स्फोटांच्या दाहकतेचा फटका बसलेला नाही. स्फोटानंतर ताबडतोब पोलिसांनी मंदिर परिसर रिकामा केलाय. सध्या, हे स्फोट कुणी घडवून आणले याबद्दल माहिती मिळालेली नाही.
बोधगयाच्या महाबोधी मंदिरानजिक रविवारी पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास हे स्फोट झाले. पाच स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिलाय.
महत्त्वाचं म्हणजे, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर यंत्रणेनं या मंदिरावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा इशारा आठवड्याभरापूर्वीच दिला होता. या भीतीमुळे मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी हत्यारं बाळगण्यासाठी परवानगीही मागितली होती.
महाबोधी मंदिरात पहाटे चार वाजल्यापासूनच पूजेअर्चेला सुरुवात होते. देश-विदेशांतून आलेले बौद्ध भिख्खू एकत्र येऊन पुजा करतात.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.