१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो!

कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.

Updated: Jan 30, 2016, 12:07 PM IST
१४ दिवसांत हा किडा तुमचा मेंदू कुरतडून टाकू शकतो! title=

नवी दिल्ली : कोलकातामध्ये मेंदूचे तंतू खाऊन टाकणारा एक बॅक्टेरिया फैलावत असल्याचं समोर आलंय.

उल्लेखनीय म्हणजे, पन्नास वर्षांपूर्वीही असा प्रकार समोर आला होता. आता कोलकाताच्या आवो-हवामध्ये असा किडा आढळलाय. 

सामान्य डोळ्यांना दिसणार नाही अशा आकाराचा हा कीडा हवेतून नाकाच्या रस्त्यानं मेंदूत शिरकाव करतो आणि सेरेब्रल टिश्यू खाऊन टाकतो. त्यामुळे व्यक्तीला 'मॅनिनजोएनसेफलाइटिस' नावाचा प्राणघातक रोग होतो. या रोगानं पीडित असलेल्या रुग्णांपैकी केवळ दोन बरे होतात. हवा आणि पाण्यासोबत हा किडा फैलावतोय. 

कोलकाताच्या सीएमआरआय हॉस्पीटलच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात एका १४ वर्षांच्या मुलामध्ये  'मॅनिनजोएनसेफलाइटिस' आढळून आला. या मुलाला वाचवण्यात यश आलंय, पण हे आश्चर्यच असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. 

स्विमिंग पुल, नदी, तलाव अशा ठिकाणी पोहायला जाताना सावधानता बाळगण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय.