आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला, दोन मृतदेह हाती

आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाचवायला गेले आणि जवळपास ५० जणांना आपल्या प्राणाला धोक्यात घालावं लागलंय.  

Updated: May 18, 2017, 11:47 PM IST
आत्महत्या करणाऱ्याला वाचवायला गेले आणि पूल कोसळला, दोन मृतदेह हाती

पणजी : आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वाचवायला गेले आणि अनेकांनी जणांनी आपले प्राण धोक्यात घातले... दरम्यान, दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय तर अजूनही ३० जण बेपत्ता आहेत.  

Add Zee News as a Preferred Source

दक्षिण गोव्यातील सावर्डे भागात जुना पोर्तुगीजकालीन पूल कोसळून जवळपास ५० जण नदीत पडल्याची घटना गुरूवारी संध्याकाळी घडलीय.

या पदपुलावरुन एका तरूणाने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाचे जवान करीत होते. हे शोधकार्य पाहण्यासाठी या पदपुलावर सुमारे ५० जण उभे होते. 

उपस्थितांच्या वजनाने हा पदपूल अचानक कोसळल्याने सगळ्यांचीच धांदल उडाली. या अपघातात सुमारे ५० लोक नदीत पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

पोलीस आणि अग्निशामक दलाचं घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.  

About the Author